न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनकडून नियम पाळण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र तरी देखील नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. १२) एकूण १२५ जणांवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाई केली आहे.
मास्क न घालणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने सुरू ठेवणे अशा कोरोना साथ पसरविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. संबंधित नागरिकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे – एमआयडीसी भोसरी (१), भोसरी (३), चिंचवड (२), निगडी (४), आळंदी (१५), चाकण (८), दिघी (१३), म्हाळुंगे चौकी (१), सांगवी (७), वाकड (१२), हिंजवडी (२),तळेगाव दाभाडे (५), चिखली (१४), रावेत चौक (२१), शिरगाव चौकी (१७).