न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरीत तीन वर्षांच्या चिमुकली बरोबर लौंगिक चाळे करणाऱ्या नराधमाला शिवाजी नगर कोर्टाने १२ वर्षे कारावास आणि १५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ही घटना सप्टेंबर २०१५ ला पिंपरीत घडली होती. संजय बाबू गायकवाड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्ना सावंत यांनी केला होता.