न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२०) :- भोसरीतील शांतीनगर येथील हॉटेल मयूरेशमध्ये व्हॉट्स अपच्या माध्यमातून मटका सुरु असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने हॉटेल मयूरेश येथे छापा टाकला. आरोपींचे मोबाइल चेक केले असता तीन आरोपी आपआपल्या मोबाइलवर ‘व्हॉट्स अप ‘ ग्रुप तयार करून त्यावर ओळखिचे लोकांकडून मटका जुगार घेत असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तीन आरोपींकडून ३३ हजार ५०० रुपये रोख रक्कम, तीन मोबाइल व हिशोबाच्या वह्या असा ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. इंद्रजीत जनार्दन भोईर (वय ३२, रा. सावंतनगर, आळंदी रोड), पवन चुडामन ठोकर, (वय ४०, रा. बौध्दनगर, पिंपरी), स्वप्नील रामेश्वर कदम (वय २१, रा. काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांच्या आणखी तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.