न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून महिलेचा खून केल्याची घटना काळेवाडीत शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास उघड झाली. यात मृताची विहिण गंभीर जखमी झाली आहे.
पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे काळेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. छाया पांडुरंग गुंजाळ ( वय ५५ रा. तुळजाभवानी कॉलनी, काळेवाडी ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विहिण संगीता सत्वधर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करीत जड वस्तूने गुंजाळ यांच्या डोक्यात प्रहार केला. पाठोपाठ सत्वधर यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. जोराचा आवाज ऐकून गुंजाळ याचे पती जागे झाले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन खुनी पसार झाला होता.