न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहणार की उठवली जाणार? हा प्रश्न कायम आहे. याप्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षणाला देण्यात आलेली अंतरिम स्थगिती मागे घेण्यात यावी यासाठी ठाकरे सरकारकडून दोन अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पूर्णपीठासमोर २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतरिम स्थगिती कायम राहणार की उठवली जाणार याचा निकाल समोर येण्याची अपेक्षा आहे. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.