न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- पेरणीच्या कामाची कामाची पाहणी करण्यासाठी पिंपरी – चिंचवडहून करमाळा तालुक्यातील मूळ गावी कंदर येथे कारने आलेल्या बाप लेकासह चालकाचा जेऊर – लव्हे रस्त्यावरील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला.
गजानन सदाशिव वैयकर (७२), सचिन गजानन वैयकर (३८, दोघे रा . पिंपरी – चिंचवड ), कारचालक राहुल नवनाथ टोणपे (२७, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव, पुणे) अशी मृतांची नावे आहेत.
बुधवारी सकाळी पिंपरी चिंचवड येथील गजानन वैयकर व व त्यांचा मुलगा सचिन हे दोघे कंदर येथे आले. तेथून ते निंभोरे येथे गेलेव क परत पिंपरी – चिचवडकडे सायंकाळी निघाले. मुसळधार पावसामुळे जेऊर येथील लव्हे रस्त्यावरील ओव्याचे – पाणी पुलावरून जोरदार वाहत असताना कार (क्र. एमएच १४ एफसी ३९७०) चालक राहुल टोणपे याने पाण्याच्या वेगवान प्रवाहातून जेऊरकडे नेण्याचा प्रयत्न केला. वेगवान प्रवाहाने कार पुलावरून ओढ्यात ओढली गेली व बेपत्ता झाली. ग्रामस्थांनी पाण्यातून न जाण्याचा सल्ला दिला, पण कारचालकाने तो ऐकला नाही व गुरुवार रात्रीपासून पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने वाहून गेलेली स्विफ्ट कार पुलाजवळच अडकलेली सकाळी दिसून आली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने क्रेन लावून कार बाहेर काढली. या प्रकरणाची खबर कार चालकाचे वडील नवनाथ जगन्नाथ टोणपे (मूळगाव झरे, ता. नेव करमाळा, हल्ली रा. थेरगाय, पुणे) करमाळा ( जि . सोलापूर ) तालुका नळी यांनी पोलिसात दिली.