- सोमवारी तीन ते पाच वेळेत अर्जस्वीकृती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती या पाच विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक २३ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे.
सभापतीपदासाठी येत्या सोमवारी (दि. १९) दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. ऋषीकेष यशोद कामकाज पाहणार आहेत.
सत्ताधारी भाजपचे बलाबल असल्याने सर्वंच समित्यांमध्ये भाजपचेच सभापती होणार हे निश्चित आहे. त्यामुळे सभापतीपदी वर्णी लागावी, यासाठी नगरसेवकांनी नेत्यांकडे फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.