न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२०) :- आई-वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या तसेच त्यांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या मुलगा व सूनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बिजलीनगर, चिंचवड येथे घडली.
सचिन जगन्नाथ गिते (वय ४१) आणि प्रियंका सचिन गिते (वय ३६) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलगा आणि सुनेचे नाव आहे. जगन्नाथ सोनुती गिते (वय ७५, सर्व रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. १६) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २०१६ ते १६ ऑक्टोबर २०२० या कालावधीत घडली. आरोपी सचिन हा फिर्यादी यांचा लहान मुलगा आहे.