न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३५० जणांवर शनिवारी (दि. १७) पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाई केली.
यात एमआयडीसी भोसरी (३०), भोसरी (२५), पिंपरी (४०), चिंचवड (१८), चाकण (४६), म्हाळुगे चौकी (१४), सांगवी (३५), वाकड (९१), हिंजवडी (१६), देहूरोड (२२), तळेगाव एमआयडीसी (२), चिखली (७), शिरगाव चौकी (४) या परिसरांचा समावेश आहे.