न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- वायसीएम रुग्णालयातील एका परिचारिकेने राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. १८) सकाळी घडली. स्मिता बाबूराव कुंदे (वय ३५, रा. मोरेश्वर कॉलनी, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या परिचारिकेचे नाव आहे.
स्मिता यांनी रविवारी सकाळी पंख्याच्या हुकाला गळफास घेऊन आहे आत्महत्या केली. स्मिता यांचे पती आणि मुले महिनाभरापासून लातूर येथे राहण्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्याचे आसपासच्या नागरिकांनी सांगितले