न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- बालाजीनगर चौक, भोसरी येथे एका टोळक्याने तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केला. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल दोन आठवड्यानंतर संबंधित सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
स्वप्नील पोटभरे, महेंद्र सरवदे, सलीम शेख, अभिषेक देवकर (सर्व रा. बालाजीनगर, भोसरी) आणि अन्य २ ते ३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई विशाल काळे यांनी रविवारी (दि. १८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान या वाढदिवसाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.