न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- पिडीत महिला आणि तिचे कुटुंब राहत असलेला फ्लॅट तिने खाली करून तो दिलीप चेतवणी याला विकावा अशी आरोपींनी मागणी आहे. मात्र फ्लॅट विक्रीस फिर्यादी महिलेने नकार दिला. त्यावरून आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपी अशोक आणि सुरेश या दोघांनी पिडीत महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांना हाताने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. १७) सायंकाळी साडेपाच वाजता डेअरी फार्म रोड, पिंपरी येथे घडली. याबाबत पिडीत महिलेने रविवारी (दि. १८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अशोक चेतवणी, जगदीश चेतवणी, सुरेश चेतवणी, मनीष चेतवणी, रेखा चेतवणी, सिमरण चेतवणी, रीत्विका चेतवणी (सर्व रा. डेअरी फार्म रोड, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.