न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- राज्य मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दहावी आणि बारावीच्या फेर परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेतल्या जाणार आहेत. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच १० वी तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी यांच्या परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहेत.
परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रं ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.