न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२०) : वाल्हेकरवाडी रोडवर गुरुद्वारा चौकात राजमुद्रा व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये लोकांना एकत्र जमवून मालकाने देशी-विदेशी तसेच बियर दारूची विक्री केली.
यामुळे कोरोना साथीचा संसर्ग पसरविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. याबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. तर आरोपी आकाश याने त्याच्या हॉटेलमध्ये कोणताही शासकीय परवाना न घेता बेकायदेशीरपणे दारूची विक्री केली.
सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत हॉटेल मधून १३ हजार १० रुपयांच्या दारूच्या बाटल्या आणि २८ हजार ३० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ऋषभ प्रदीप हादगे (वय २९, रा. निगडी), आकाश पोपट आडसूळ (वय २९, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल चालकांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे भगवंता मुठे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.