न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२०) :- तीन दिवसांसाठी भाडेतत्वावर नेलेल्या कारचा ग्राहकाने अपहार केला. ही घटना वाकड परिसरात १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे.
भारतभाई चंदूभाई रतवा (वय ३१, रा. डोलकीया, ता. संनखेडा, जि. बडोदरा, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत मनमोहन ओंकारसिंह अहलुवालिया (वय ५९, रा. मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे) यांनी १९ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली आहे. फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीकडून ग्राहकांना भाड्याने कार दिल्या जातात. १८ ऑगस्ट २०२० रोजी आरोपी रतवा याने फिर्यादी यांच्या कंपनीची कार ऑनलाइन तीन दिवसांसाठी बुक केली.
१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आरोपी रतवा याने बुक केलेली कार कंपनीच्या चालकाने गुजरात येथे नेऊन रतवा याच्या ताब्यात दिली. दोन दिवसांत तुमची कार परत देतो असे सांगून रतवा निघून गेला. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांनी पुन्हा आरोपील फोन करण्याचा प्रयत्न केला असता फोन लागला नाही. तसेच कारचे जीपीएस लोकेशन देखील मिळणे बंद केले.