न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२०) :- पुणे – नाशिक महामार्गावरील धावडे वस्ती येथील रोशल गार्डनसमोर एक इसम रस्ता ओलांडत होता. त्यावेळी त्याचा दुभाजकावरील विद्युत खांबाच्या उघडया वायरला स्पर्श होऊन शॉक बसला व तो इसम रस्त्यावर कोसळला.
त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता धावडेवाडी, भोसरी येथे घडली. रवी महादेव जोगदंड (वय ४५, रा. पत्राचाळ, अजिंठानगर, निगडी) यांचा विचित्र अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
धीरज महादेव जोगदंड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाला अटक झाली असून, महावितरणच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल लक्ष्मण राठोड (वय ३४, रा. उंब्रज, ता. कराड, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.