न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस नाईक रमेश लोहकरे यांचे आज (शुक्रवारी, दि. २३) कोरोनामुळे निधन झाले. लोहकरे चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक रमेश लोहकरे यांचा ३० सप्टेंबर रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना शहरातील एका खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर उपचार सुरू होते.उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली. कोरोनाशी लढताना लोहकरे यांची शुक्रवारी सकाळी प्राणज्योत मालवली. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे.