न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- कोरोना महामारीच्या काळात पोलिस प्रशासन हे आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कार्यरत असतात. त्यामुळे अश्या या कोरोना योद्धांनचा सन्मान केला पाहिजे म्हणून भा.ज.पा.चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा कुंदाताई भिसे व संस्थापक उन्नति सोशल फाउंडेशन संजय भिसे यांचा हस्ते या योद्धयांचा सन्मान करण्यात आला.
कुंदाताई भिसे म्हणाल्या की जसे डाॅकटर, सफाई कर्मचारी हे कार्यरत होते. तसेच कोरोना महामारीच्या काळात पोलिस प्रशासन हेसुद्धा जनतेच्या रक्षणासाठी, सुरक्षतेसाठी अहोरात्र सतत कार्यरत होत व कोरोना काळात पोलिस प्रशासनाची जनतेसाठी खुप मोठी मदत झाली. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.
यावेळी अतुल पाटिल, शैलेष बासुतकर, विकास काटे, शाम कुंजीर, महेश गवस, विवेक भिसे, ऋषिकेश होणे, अनिकेत फुरंगे, अँड. मुक्ता खानदेशी, सोनाली शिंपी व इतर महिला पोलिस अधीकारी व मान्यवर उपस्थित होते.
पोलिस निरिक्षक रंगनाथ उंडे व उपनिरीक्षक अजय भोसले यांनी कुंदाताई भिसे व संजय भिसे यांचे आभार व्यक्त केले. उन्नति सोशल फाउंडेशनचे समाजकार्य हे नेहमी समाजपयोगी व कौतुकास्पद असतात व पुढिल समाजपयोगी कार्यासाठि शुभेच्छा दिल्या.