न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- एकापेक्षा एक सरस रचना राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व नवा गंधा प्रस्तुत ‘ काव्य पंढरी ” या ऑनलाइन कवी संमेलनात कवींनी सादर केल्या. माझा करपला मळा … ‘ टोळ धाड आली … ” , ‘ माय सासरी नांदते ” , ‘ प्रेमात मी जरासा आसक्त होत गेलो ” अशा कवितांचा त्यात समावेश होता.
कवी संमेलनाचे उद्घाटन प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रकाश रोकडे होते. प्रा. अशोककुमार पगारिया प्रमुख पाहुणे होते. प्रा. वानखेडे, शंकर आथरे, शिवाजी चाळक, रंजना बोरा, संतोष घुले, संगीता झिंजुरके, चंद्रकांत धस, मीना शिंदे, दत्तू ठोकळे, देवेंद्र गावंडे, मधुश्री ओव्हाळ यांनी रचना सादर केल्या.
डॉ. भीम गायकवाड यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांना आदरांजली वाहिली. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. वैभवी रोकडे हिने स्वागत केले. मीना शिंदे यांनी आभार मानले.