न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७४ जणांवर गुरुवारी (दि. २२) भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाई केली.
नागरिकांनी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. गुरुवारी केलेली कारवाई एमआयडीसी भोसरी (२२), भोसरी (२३), पिंपरी (१६), चिंचवड (३), निगडी (२२), चाकण (१), दिघी (१९), सांगवी (३६), वाकड (७५), व हिंजवडी (२३), देहरोड (२४), चिखली (१०) येथे गुन्ह्यांची नोंद झाली आहे.