न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- दसरा सणानिमित्त शासकीय सुट्टी असली, तरी नागरिकांना दस्त नोंदणी करण्यात यावी यासाठी शहरातील काही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत. शनिवार (दि. २४) व रविवार (दि. २५) जोडून येणारी सुट्टी त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यायासाठी या दोन्ही दिवशीदेखील ही पाच कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दसऱ्याच्या मुहुर्तावर नागरिकांना दस्त नोंदणी करता येणार असून सणाच्या दिवशी घर खरेदी केल्याचा आनंद नागरिकांना मिळणार आहे. दसरा सणानिमित्त घर खरेदी, दुकाने आणि जमिनीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. या दरम्यान दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होते.
दसऱ्याच्या मुहुर्तावर दस्त नोंदणी करण्याचा नागरिकांचा आग्रह असतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरू करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी काढले आहेत.