न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२०) :- केंद्र सरकारनं २०१९-२० वर्षातील वैयक्तिक आयकर भरण्यासाठीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. यापूर्वी ३० नोव्हेंबरपर्यंत आयकर भरण्याची अंतिम तारीख दिली होती.
सीतारामन यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्जाच्या व्याजावरील व्याज माफ करण्याच्या निर्णयाची माहिती देतानाच आयकर भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती दिली. ३१ डिसेंबरपर्यंत ही आयकर भरण्यासाठीची अंतिम तारीख असून, नागरिकांना केंद्राच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.