- आमदार लांडगे यांची राजकीय कारकीर्द नवोदितांसाठी आदर्श..
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२०) :- भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आपलं राजकीय स्थान एवढं भक्कम करून ठेवलं आहे, की त्यांना हरवणं आता कोणालाही शक्य नाही. राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे ‘हरणं मला माहीत नाही’, हा आत्मविश्वास त्यांच्या अंगी ठासून भरलेला आहे. आगामी राजकीय जीवनात कितीही कठोर अडथळे आले तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची त्यांची भूमिका इतरांना आदर्श घालून देणारी ठरेल, अशा शब्दांत राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार महेश लांडगे यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीचे कौतुक केले.
चालू पंचवार्षिकच्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विजयाला आज (दि. २४ ऑक्टोबर ) एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आमदार लांडगे आणि आमदार जगताप यांचा पिंपळे सौदागर येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवि अनासपुरे, महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, प्रदेश सदस्य एकनाथ पवार, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, महिला अध्यक्षा उज्वला गावडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व समित्यांचे सभापती, सर्व प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व मंडलाध्यक्ष, पक्षाचे प्रदेशाचे व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले. तर सरचिटणीस विजय फुगे यांनी आभार मानले.