न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑक्टोबर २०२०) :- चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने कोरोना प्रादुर्भावचा विचार करता नवरात्रौमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह कमी होवू नये यासाठी कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्हाडे यांनी इ. ११ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने स्पर्धेच्या स्वरुपात रास दांडीया नृत्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
स्पर्धेतील सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातूनच ऑनलाईन पद्धतीने अतिशय सुंदर, देखणे वैयक्तिक व समूहाद्वारे नृत्य सादर करून स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत विजेत्यांचे संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी विशेष अभिनंदन केले.
या स्पर्धेत वैयक्तिक व समूह स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक श्रृती विषे, पायल सिंग, पल्लवी सिंग, तेजस्विनी कांबळे तर, तृतीय क्रमांक नंदिनी योगी, रिया, रिचा चौहान, लक्षिता शर्मा, रुपा शेलार पारितोषिके पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण प्रा. स्नेहा भाटिया, प्रा. हर्षदा सोमवंशी, प्रा. तृप्ती बजाज व प्रा. संध्या गोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वृषाली वाघमारे व विद्यार्थी देवांशी कविंगल व आदित्य रंजन यांनी केले. तर, प्रा. सुरेखा कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान विभागाच्या समन्वयिका, शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी विशेष परिश्रम घेतले.