- प्रतीक्षा यादीत २४ हजार ९८० विद्यार्थ्यांची निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२०) :- शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागावरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. २९) प्रवेश घेता येणार आहेत.
राज्यातील प्रतीक्षा यादीत २४ हजार ९८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील आठ हजार ४८० विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. तर आठ हजार १७६ विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल प्रवेश झाले आहेत.
रिक्त जागानुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल. पालकांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून पाहावे. शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये. बालकांना शाळेत घेऊन जाऊ नये. आवश्यक मूळ कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन जावे. पोर्टलवरुन हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची सद्यस्थिती :-
जिल्हा : निवड झालेले विद्यार्थी प्रोव्हिजनल प्रवेश निश्चित प्रवेश
पुणे : ४७६५ १८८५ १६२४
नगर : ८०३ ३३५ ३६८
नाशिक : १३६० ४८० ४३२
सोलापूर : ४४६ २१२ २०२
ठाणे : १९१२ ४९२ ७५७
औरगाबाद : १५३९ २९२ ३९५
नागपूर : १७८० ७५६ ४३१
कोल्हापूर : २७० ८९ १२८