न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात परराज्यातून चोरून आणलेल्या महागड्या मोटारींचा चेसी नंबर बदलून त्या कमी किंमतीत विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटी ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
१३ महागड्या मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यातील मुख्य आरोपी हा इन्शुरन्स कंपनीकडून अपघातात नुकसान झालेली मोटर घेऊन आणि हुबेहूब रंगाची मोटार इतर राज्यातून चोरून आणून त्याचा चेसी नंबर बदलून मोटार विकत असे अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.
या प्रकरणी मनजीत जोगिंदरसिंग मारवा, दीपक चमनलाल खन्ना, प्रतीक उर्फ नागेश छगन देशमुख आणि हारून शरीफ शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी, मनजीत मारवा याच्या विरोधात दिल्ली, हरियाणा, येथे १२ गुन्हे दाखल आहेत.