न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा बंद असल्या तरी दररोज ऑनलाइन शिक्षणाचे धडे शाळांकट्टन दिले जात आहेत.
या ऑनलाइन शिक्षणात दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
दरम्यान , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरात लवकर अकरावीचा महाविद्यालय प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. न्यायालयीन प्रक्रियेमुळे याला विलंब होत असला तरी ऑनलाइन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.