न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या मटका जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात २८ हजार ३५० रुपयांच्या रोकडसह मोबाइल व दुचाकी असा एकूण ७५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी येथे सोमवारी (दि. २) पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. मनोज इंगळे, असे मटका जुगार अड्डाचालक व मालकाचे नाव आहे. त्याच्यासह इतर चार जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहकारी बँकेच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर काही जण कल्याण मटका जुगार खेळत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. मटका चालक आरोपी इंगळे याने लोकांना एकत्र बसवून गर्दी केली होती. कोरोनाचा संसर्ग होऊन मानवी सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केले. कल्याण मटका जुगार खेळताना व खेळविताना आरोपी मिळून आला.