न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- बालाजीनगर झोपडपट्टी येथे तलवारीने केक कापल्याच्या गुन्ह्यातील आरोपी अभिषेक सुरेश देवकर (वय २०, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तलवारीने केक कापल्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलवारीने केक कापल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर प्रसारीत झाला होता. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. तसेच, चौकातील गुन्हेगारांवर कठोर भूमिका घेण्यास पोलिसांना बजावले होते.
पोलीस हवालदार निशांत काळे आणि पोलीस शिपाई सुधीर डोळस यांना भोसरीच्या गुन्ह्यातील आरोपी अंकुशराव लांडगे – सभागृहासमोर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत देवकरला ताब्यात घेऊन एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती खंडणी व दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिली.