न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड पोलिसांनी बिजलीनगर परिसरात सापळा लावून बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली.
पिस्टल आणि काडतुसे जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ६) बीजलीनगर येथे करण्यात आली. तुषार उर्फ दादया रविद्र खांगटे (वय ३२, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.