न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- बांधकाम साईटवरून दोन लाख १३ हजारांची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. पुनावळे येथे शुक्रवारी (दि. ६) रात्री १० ते शनिवारी (दि. ७) सकाळी १० या कालावधीत चोरीचा हा प्रकार घडला. योगेश साहेबराव पाटील (वय ३५, रा. च-होली) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी पाटील हे इको पॉलिटन कन्स्ट्रक्शन कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीची पुनावळे येथे बांधकाम साईट आहे. त्या साईटवरून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख १३ हजार २०५ रुपये किमतीच्या वायर चोरून नेल्या. याबाबत साईटवरील सुरक्षारक्षक राम यादव आणि कामगार मेहबूब अन्सारी यांनी फिर्यादी पाटील यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.