न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने व युवती अध्यक्षा कु. वर्षा जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी, चिंचवड व भोसरी या विधानसभा मतदारसंघात सफाई कामगार, लहान मुले तसेच घरकाम करणारे महिला यांना दिवाळी फराळ, रंगवलेले दिवे, आकाशकंदील, मास्क इ. साहित्याचे वाटप करण्यात आले.
एक दिवा उद्याच्या उमेदीचा ह्या उपक्रमाअंतर्गत पणत्या रंगवून त्यावर सजावट करून त्या बाजारात विक्री करून येणारा जो निधी आहे त्यातून घेण्याचा विशेष प्रयत्न केला.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटिल, मा. महापौर योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशांत शितोळे, फजल शेख यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला. ऋतुजा बिराजदार (चिंचवड विधानसभा युवती अध्यक्षा), नेहा पडवळ (उपाध्यक्षा पिं.चिं शहर), गीता मोरे (पिंपरी विधानसभा युवती अध्यक्षा), सायली निकम, सारिका ढमे यांच्या पुढाकारने व हीना अत्तार, स्नेहल लायगुडे, शलाका बनकर, अश्विनी पवळ, सोनल वाळुंज, तृप्ती इ . च्या सहभागातून कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कविता खराडे, गंगाताई ढेंडे, आशाताई सुर्यवंशी, पोपट पडवळ, अशोक मगर, आबासाहेब गवळी, सुजाता विधाते, सविता मिटगुले, प्रेमा शेट्टी, रंजना रणदिवे, माऊली मोरे, साहुल भाई, अकबर भाई, राधिकाताई, धनाजी तांबे आदी उपस्थित होते.