न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सोळाशे सफाई कामगार महिला कंत्राटी पद्धतीने साफसफाई आणि इतर विविध प्रकारची कामे करतात त्यांना दिवाळी निमित्त ८.३३ टक्के बोनस आणि कोविडकाळात आपत्ती परिस्थितीत सेवा दिल्याबद्दल नऊ हजार पाचशे रुपये कोविड भत्ता मिळणार आहे, अशी माहिती कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत नुकतीच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य आरोग्य अधिकारी अनिल रॉ, आरोग्य अधिकारी देशपांडे आणि ठेकेदार उपस्थित होते. सफाई कामगारांना बोनस कोविड भत्ता मिळावा या साठी उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक काटे यांनी मध्यस्थी करून आयुक्त यांच्या सोबत बैठक घडवून आणली आणि प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य केले.
कष्टकरी कामगार पंचायत वतीने साफ सफाई कामगार महिलांच्या प्रश्नावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर आंदोलन करण्यात आले होते तसेच पंचायत वतीने सतत पाठपुरवठा करण्यात आला ,या आंदोलनास आज यश आले असून ,आज महिलांची दिवाळी बोनस आणि कोविड काळात दिलेल्या सेवे बाबत विशेष भत्ता मिळणार आहे, या मुळे त्यांची दिवाळी गोड झाली असून या बाबत महिलांनी आनंद व्यात करत, एकमेकींना पेढे भरवत आनंद साजरा केला.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले हि चांगली सुरवात असून पुढील काळात महिलांना कायम करण्यासाठी आणी त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरवठा करणार असून त्यांचे इतर विविध प्रश्न मार्गी लागावेत यासाठीचा लढा सुरू राहिल असे बाबा कांबळे म्हणाले.