- आज शहरात १७२ जणांना कोरोनाची बाधा; सात जणांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) रोजी १७२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सात जणांचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८९२८३ वर पोहोचली आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीतील चिंचवड (७० वर्षे, ४६ वर्षे), प्राधिकरण (६४ वर्षे) अशा तीन पुरुषांचा तर, पिंपळे सौदागर (४५ वर्षे), पिंपरीतील ५९ वर्षे अशा दोन स्त्रियांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर, हद्दीबाहेरील पिंपळवंडी (७० वर्षे), नऱ्हे आंबेगाव खुर्द (६५ वर्षे) अशा दोन स्त्रीयांचा मृत्यू झालेला आहे.
शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८६२७५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५५८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.