न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२०) :- महिलेच्या विनयभंगप्रकरणी एका डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ७ नोव्हेंबर रोजी रात्री डांगे चौकातील अमृता मॅटर्निटी हॉस्पिटल येथे घडला. डॉ. विजयकुमार मेटे (वय ४०, रा. अमृता मॅटर्निटी हॉस्पिटल, डांगे चौक, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
याबाबत पीडित महिलेने मंगळवारी (दि. १०) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेटे डांगे चौक येथील अमृता मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये काम करतो. त्याने ७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पीडित महिलेचा हात धरून तिच्याशी गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.