न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२०) :- पुणे पदवीधर मतदार संघासाठी गुरुवारी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली. पुणे पदवीधरसाठी १०८ तर शिक्षकसाठी ६७ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जाची शुक्रवार (दि. १३) रोजी छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची १७ नोव्हेंबर अखेरची मुदत आहे.
माघारीनंतरच दोन्ही मतदारसंघाचे खरे चित्र स्पष्ट होईल. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून गर्दी होत होती. परंतु, सर्व नियम धाब्यावर बसवत उमेदवारी दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने पुण्यासह अन्य जिल्ह्यातून इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयात येत होते. पोलिसाकडून मास्क न घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात होती.