न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२०) :- दारू पिऊन विनाकारण मित्राला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच बिअरची फुटलेली बाटली पोटात मारून गंभीर जखमी केले. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड येथे रविवारी (दि. ८) सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला.
हुसेन अल्लाउद्दीन मुल्ला (वय ३४, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड), असे जखमी झालेल्या रिक्षाचालक मित्राचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मित्र हुसेन बागवान (वय ३४, रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुल्ला आणि आरोपी बागवान हे दोघेही मित्र आहेत. आरोपी याने दारू पिऊन रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोरया हौसिंग सोसायटी येथे आला. त्यावेळी फिर्यादी यांना विनाकारण शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.