- चिंचवडच्या प्रतिभा इन्स्टिट्यूटमध्ये संविधान दिन साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२०) :- संविधान दिनानिमित्त चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्टमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या निर्देशानुसार भारतीय संवीधान दिनाच्या निमित्ताने जनजागृती निर्माण करण्यासाठी डॉ. महिमा सिंग यानी संविधान वाचन व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
यावेळी कमला शिक्षण संकूलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, एम. बीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगांवे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. सुमित बागल, समवेत प्राध्यापक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कोरोना साथीचा प्रादूर्भाव लक्षात घेता शासकीय नियमाचे पालन करीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
डॉ. दिपक शहा म्हणाले, आपल्या संविधानात भारतातील नागरीकांना त्यांचे मुलभूत हक्क व अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केले. सर्व भारतीय एक समान व समान हक्काची जाणीव करून देणारे आपले भारतीय संविधान आहे. आपल्या भारत देशाला उज्वल करण्यासाठी समाजातील विविध वाईट प्रथा, घडणाऱ्या घटना रोखण्याकरिता सामुहीकरित्या प्रयत्नाची गरज आहे. यासाठी तरुणानी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यकृमाची प्रस्तावना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी तर, संचालक डॉ. सचिन बोरगांवे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रा. सुमित बागल यांनी मानले.