न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- जमिनीची विक्री झालेली असतानाही पुन्हा विक्रीचे आमिष दाखवून एकाची सुमारे ७ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवडगावातील दोघांवर आणि काळेवाडी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग दगडू पडवळ, विश्वनाथ पांडुरंग पडवळ (दोघे रा. मोरया गोसावी मंदिराजवळ, पडवळ आळी, चिंचवडगाव) आणि मेहबूब दस्तागिर शेख (रा. साईदर्शन कॉलनी, काळेवाडी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनाज अश्फाक पठाण (वय ४१. रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.