विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२०) :- जुनी सांगवी येथील श्रीकृष्ण मंदिरजवळ संशयितरित्या फिरत असलेल्या दोन तरुणांकडून विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अभिषेक विष्णु कदम (वय २१, रा. कुंभारवाडा, जुनी सांगवी) व लक्ष्मण गणेश शेळके (वय २२, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई खोपकर यांनी फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस परिसरात गस्त घालत असता त्यांना काळया रंगाचा शर्ट व केशरी रंगाचा स्वेटर परिधान केलेले दोन इसम संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले.
थांबवण्याचा इशारा केला असता त्यांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीची पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.