- अटीतटीच्या लढाईत कोण आगे? कोण पीछे?
- यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपचा कस लागणार…
- निवडणूक केंद्र व बूथवर मतदात्यांच्या कोरोनाविषयक काळजीची उमेदवार विसापुरे यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३० नोव्हेंबर २०२०) :- पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी व भाजप या दोन तुल्यबळ राजकीय पक्षांनी आप-आपली ताकद दाखवून प्रचाराच्या रणधुमाळीतील वातावरण ढवळून काढले आहे. सातारा-सांगली-कोल्हापूर-सोलापूर-पुणे जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघात ६०३३७ तर, पदवीधर मतदार संघात ३ लाख ४३ हजार मतदार आहेत. पुणे व सोलापूर या जिल्ह्यात मतनोंदणी जास्त झाल्याने, तेथील मतदार निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या आप-आपल्या उमेद्वाराने राजकीय बळ दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न केला दिसत आहे.
पण, खरा संघर्ष दोन पक्षातच वाढल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. आगामी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतील रंगीत तालीम व मतदार चाचपणी म्हणून हे दोन्ही बलाढ्य पक्ष रिंगणात उतरले असून, पश्चिम महाराष्ट्रात महाआघाडी या निमित्त आपले बळ आजमावत आहे. तर, भाजप आपली ताकद विशेषत: सोलापूर, पुणे येथील गड शाबूत ठेवून, मतदान प्रभावी केंद्रबिंदू साताऱ्यात निर्माण करून, सातारा-कोल्हापूर गादीच्या राजश्रयामुळे पुणे व सोलापूर येथील राजकीय गणित आता राजाश्रयाच्या धोरणाने चालविण्याचा डाव यशस्वी करण्यात यशस्वी ठरला आहे.
महाआघाडीस शह देण्यासाठी सांगलीकर कारखानदार यांची आर्थिक ताकद घेऊन, मैदानात उतरले आहेत. पक्ष बांधणीवर भरोसा असल्यामुळे व अंतर्गत धोरणामुळे अधिकृत पदवीधर मतदार संघावर जास्त भर दिसतो.
- मान्यवर रयत व स्वामी संस्थेचा कौल?
महाआघाडीत वेगवेगळे पक्ष एकत्रित असल्यामुळे महाआघाडीचे उमेदवार प्रचारयंत्रणा व मतदारांपर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरले असून, शैक्षणिक गणिताबरोबर प्रशासकीय गणित सोडविले व घड्याळाचे काटे आताच फिरले तर, घड्याळाच्या वेळेप्रमाणे पुढील वाटचाल होईल. सूचनात्मकरित्या पश्चिम महाराष्ट्रातील मान्यवर रयत व स्वामी संस्था कौल देण्यास सतर्क झाल्या आहेत. पण, महाआघाडीस उमेदवार त्याचा उपयोग किती होईल हे मतदानातूनच स्पष्ट होणार आहे.
पुणे येथील अधिकार क्षेत्रामुळे स्वामीची मते आपल्या घरात पायबंद तर, रयत संस्था आपला हक्क व आघाडी धर्म जोपासणार किती? यावर भिस्त पण, जुने ऋणी कोल्हापूरद्वारे फेडण्याचे धोरण शिक्षक मतदारकेंद्रात खळबळजनक ठरणार आहे.
- कोविडमुळे मतदानाची टक्केवारी घसरणार?
पदवीधर मतदार जरी जास्त असले तरी, उमेदवारांची संख्याही जास्त असल्याने उमेदवार अडचणीत आहेत. एकंदरीत मतदारसंघाचा आढावा घेतला असता, कोविड्चे वातावरण बघून मतदानाची टक्केवारी कमीत-कमी होण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे उमेदवार अडचणीत आहेत. शिक्षक व पदवीधर मतदान व मतदार प्रक्रिया अशा रीतीने अंतिम टप्प्यातील चित्र दर्शवित आहे. आज सायंकाळनंतर प्रचार यंत्रणेच्या तोफाही थंडावणार आहेत.
- निवडणूक केंद्र व बूथवर मतदात्यांच्या कोरोनाविषयक काळजीची मागणी…
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विभागातील सर्वच निवडणूक केंद्रावर व बूथवर मतदानासाठी येणाऱ्या सर्व मतदार बंधू व भगिनी यांची कोरोना विषाणूपासून सुरक्षा व्हावी, यासाठी सुरक्षाविषयक प्रणालींची अंमलबजावणी करावी. तसेच निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांचीदेखील जीवन सुरक्षिततेच्या दृष्टीने आरोग्यविषयक पूर्ण काळजी घ्यावी, अशा आशयाचे निवेदन पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुधीर सुर्यकांत विसापुरे यांनी पुणे विभागीय आयुक्त, निवडणूक निर्णय कार्यालयास नुकतेच दिले आहे.