- शिर्डी साईबाबा संस्थानाचे भाविकांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२०) :- साई मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहरावात यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. धार्मिक स्थळीही काहीजण पर्यटनस्थळ म्हणूनच वावरत असतात.
तीर्थक्षेत्रीही अनेकजण तोकडे कपडे घालून येतात. त्यामुळे तेथील पावित्र्य धोक्यात येते तसेच भाविकांच्या भावनाही दुखावल्या जातात. यामुळे
मंदिर परिसरात येताना भाविकांनी भारतीय पेहरावात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
साईबाबा संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी महिला भाविकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करत भाविकांनी मंदिर परिसरात भारतीय पेहरावात यावे, असे फलक सोमवारी संस्थान परिसरात लावले.