न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२०) :- भोसरी एमआयडीसी, ब्लॉक ‘ एच ‘ परिसरात उघड्यावर बांधकाम राडारोडा टाकल्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाला ५७ हजार रुपयांचा दंड महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
बांधकामाच्या ठिकाणी झालेला राडारोडा डंपरमधून आणून तो एमआयडीसीत टाकला जात होता. ही बाब आरोग्य पथकाच्या निर्देशनास आली. त्यामुळे संबंधित डंपरचालकास विचारणा केली असता, राडारोडा सोम प्रोजेक्टस प्रा. लि. चा असल्याचे सांगण्यात आले.
त्यानुसार सोम प्रोजेक्टला तब्बल ५७ हजारांचा दंड करण्यात आला आहे. पुन्हा उघड्यावर राडारोडा टाकल्यास मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा सक्त इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.