- आज सायं. ७ नंतर शिक्षक तर, रात्री ९ नंतर कळणार पदवीधरचा विजयी उमेदवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२०) :- पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला आज (दि. ३) सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. ५० मतपत्रिकेचा गठे बनवले. ही प्रक्रिया किमान दोन वाजता संपली, आता वैध आणि अवैध मतांची विभागणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत चालेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
प्रथम टपाली मतांचे गठ्ठे तयार करण्यात आले. त्यामध्ये पदवीधरचे ८६७ तर शिक्षकासाठी ३२ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर दुपारी तीन ते रात्री ९ वाजेपर्यंत वैध आणि अवैध मतांची विभागणी केली जाणार आहे. त्यानंतरच पदवीधर उमेदवाराचा विजयाचा कोटा निश्चित होईल. तर सांयकाळी ७ वाजता शिक्षकचा कोटा निश्चित होईल, असे राव यांनी सांगितले.
रात्री ९ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून, त्यामध्ये पहिल्या पसंतीचे मते ज्या उमेदवाराला मिळाली आहेत, त्याला विजय घोषित केले जाईल. जर विजयासाठी आवश्यक असलेली मते कोणत्याही उमेदवाराला मिळाली नाही तर दुसऱ्या पसंतीचे मते मोजायला सुरुवात केली जाणार आहे. पदवीधरसाठी ६० फे-या होणार असून, त्यासाठी प्रत्येक फेरीला अर्धा तास लागू शकतो. तर शिक्षकमध्ये पसंती क्रमांक १ ची मते कोणत्याही उमेदवाराला मिळाली नाही तर त्यांचेही पसंती क्रमांक २ मते मोजली जाणार आहेत, त्यासाठी ३० फेऱ्या होतील, असे राव यांनी सांगितले.