- मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन ‘आरोग्य दिन’ म्हणून राज्यभर साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२०) :- धकाधकीच्या जीवनात पत्रकार स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस धावपळ करून, परिसरातील घडामोडींचा आढावा घेऊन वृत्त संकलन करत असतात. अशावेळी स्वतःच्या आरोग्याची काळजी नाहीच, परंतू परिवाराकडे लक्ष द्यायला ही वेळ नाहीये. त्यामूळे विविध प्रकारचे शारीरिक आजार पाठीमागे लागून कौटुंबिक घडी विस्कटून गेल्याने अनेक पत्रकारांची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्या अनुषंगाने मराठी पत्रकार परिषद मूंबई संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांसाठी तालेरा रूग्णालय चिंचवड येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी ३ डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिवस आरोग्य दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर मूख्य विश्वस्त एस एम देशमुख, किरण नाईक, राज्य अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो. पत्रकार मग तो प्रिंट मिडिया असो, न्यूज पोर्टल, चॅनल प्रतिनिधी वा फोटोग्राफर असो सर्वांच्या कूटूंबीयांसाठी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने परिषदेचा ८२ वा वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केले होते.
यामधे मधूमेह, (शूगर) उच्चरक्तदाब (बि. पी.), सर्दी खोकला अशा विविध तपासणी करून मोफत औषधे उपलब्ध करून दिली. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे, परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी तपासणी करून घेतली व उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. परिषदेचे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्या विशेष प्रयत्नातून शिबीर संपन्न झाले.
यावेळी उपाध्यक्ष प्रविण शिर्के, पत्रकार हल्ला विरोधी समिती सदस्य अनिल भालेराव, जिल्हा सदस्य दादाराव आढाव, खजिनदार विनय लोंढे, माधुरी कोराड, सूरज साळवे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी शिबिराचा लाभ घेतला. यासाठी तालेरा रुग्णालयाचे प्रमूख डाॅ. सूनिल जाॅन, डाॅ राजेंद्र फिरके व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.