न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्याची तपासणी केली. अशा तक्रारी पालकांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. संबधित शाळांना नोटीस पाठवून या प्रकाराचा खुलासा मागितला आहे.
ज्या शाळा विद्यार्थ्यांकडे शुल्कासाठी तगादा लावत आहेत. शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन ग्रुपमधून ब्लॉक करत आहेत, अशा शाळांनाही नोटीस बजावली आहे. शहरातील ४० खासगी इंग्रजी शाळांविरोधात शुल्क वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. त्यातील २५ शाळांना पालिकेच्या शिक्षण विभागाने ५३ नोटिसा पाठविल्या आहेत.