- हिंजवडी पोलिसांकडून आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- हिंजवडीत २७ नोव्हेंबर रोजी एका ठेकेदाराच्या हत्येचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. छट पुजेला जाऊ दिलं नाही या रागातून कामगाराने ठेकेदाराची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
अरविंद चौहान असं या आरोपीचं नाव असून हिंजवडी पोलिसांना त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. ठेकेदार व आरोपी कामगार हे हिंजवडीत एकाच खोलीत राहत होते. नोव्हेंबर महिन्याच्या २७ तारखेला हिंजवडी परिसरातील जांभे येथे गणपत सदाशिव सांगाळे या ठेकेदाराचा बंद खोलीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.
या प्रकरणी अधिक चौकशी केली असता त्याच्या सोबत राहात असलेल्या कामगाराने खून केला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल होत. मात्र, आरोपी अरविंद हा फरार झाला होता.