- तब्बल २८ जणांवर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ३) रोजी तब्बल २७ तर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून एक असे एकूण २८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाकड पोलीस ठाण्यात ११, पिंपरी पोलीस ठाण्यात १४ तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात २ असे एकूण २७ गुन्हे महापालिकेकडून दाखल करण्यात आले आहेत.
पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधितांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात येते. गुरुवारी गुन्हे दाखल झालेल्या संबंधितांनाही पालिकेने नोटीस बजावली होती. पालिकेने दिलेल्या वेळेत आरोपींनी त्यांचे बांधकाम काढले नाही. याबाबत पालिकेकडून संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.