- आसगावकर यांना २५ हजार ९८५ तर, सावंत यांना १५ हजार ३५७ मते…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२०) :- पुणे शिक्षक मतदार संघात महा आघाडीचे जयंत आसगावकर यांनी विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. आसगावकर यांनी ३३ फेरीपर्यंत निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या मतांमधील दुस-या पसंतीच्या मतांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आसगावकर यांनी २५ हजार ९८५ मते घेतल्याने अखेर तब्बल ३६ तासानंतर विजय निश्चित झाला.
३३ व्या फेरीत आसगावकर यांना २२ हजार ३४५, सावंत यांना १५ हजार ३५७ तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना ७ हजार २९४ मते मिळाली. यामुळेच आसगावकर यांच्या विजयासाठी शेवटची ३४ फेरीची म्हणजे सावंत यांच्या दुस-या पसंतीची मते मोजावी लागली.
यात आसगावकर यांनी मतांचा निश्चित केलेला कोटा पूर्ण करत २५ हजार ९८५ मते घेतली. तर सावंत यांना १५ हजार ३५७ मते मिळाली. यामुळे आसगावकर यांचा १० हजार ६२६ मतांनी विजय झाला.