न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ५ डिसेंबर) रोजी १६७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९३२५५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८९५९३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६६० जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष पिंपळे गुरव (७८ वर्षे), चिखली (४३ वर्षे), सांगवी (५७ वर्षे) ०१ स्त्री – सांगवी (८० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – उस्मानाबाद (७० वर्षे) ०१ स्त्री – बालेवाडी पुणे (४५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.